Posts

Showing posts from December, 2014

कविता गेली खड्ड्यात...!

मायबोली हितगुज दिवाळी अंक-२०१४ मधला लेख --------------------------- अशी कशी ही माझी आई! अशी कशी ही माझी आई! पहावे तेव्हा मागेमागे करते, दिवसात दहा कामे सांगते, ‘नाही’ म्हणायची सोय नसते, कपाळावर तिच्या आठी असते. हे खा, ते खा, कटकट करते, डब्यात नेमकी पोळी-भाजी देते, भजी, वडे कधीतरीच करते, पिझ्झाच्या ‘पि’लाच डोळे वटारते. सारखे शिस्तीचे धडे शिकवते, खोलीतला पसारा आवरायला लावते, स्वतः रविवारी सोफ्यात रेलून, पेपर वाचत टी.व्ही. बघते!! अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई! कपाट माझं आवरून ठेवते, हरवलेली वस्तू शोधून देते, पेपरमधला छानसा लेख, शेजारी बसवून वाचून दाखवते. पाय दुखले की चेपून देते, ताप आला की मऊ भात देते, कंटाळा आला की जवळ येऊन, केसातून हात फिरवत राहते. इतकी मोठी झाले मी, तरी खिडकीतून मला टाटा करते, परतायला उशीर झाला की, एकटीच काळजी करत बसते. अशी कशी बरं माझी आई! अशी कशी बरं माझी आई! माझं एकच ऐकशील का आई? नको म्हणूस, "होऊ कशी उतराई", तुझ्यामुळे मी या जगात आले, आई! तुझ्यामुळे मी या जगात आले, आई! व्हॉट द फ... सॉरी! पण ही काय कविता आहे?? कविता अशी