घरोघरी मातीच्या चुली - 3
घरोघरी मातीच्या चुली - 1 घरोघरी मातीच्या चुली - 2 ---------- "ए, जरा मुलांकडे बघशील ना दुपारी? माझी ब्यूटिशियन येणारे घरी." "पुन्हाऽऽ?" "ओरडायला काय झालं इतकं?" "अगं, पंधरा-वीस दिवसांपूर्वीच आली होती ना?" "छे! महिना होत आला." "अगं, पण मग इतक्यात पुन्हा?" "हो, मग! असंच जाणार आहोत का आपण?? बरं दिसेल का ते?" "कुठे जाणार आहोत? आणि आपणऽऽ?? म्हणजे मी पण??" "(जरासा त्रासिक चेहरा करत) ओरडत जाऊ नकोस रे साध्या साध्या गोष्टींत..." "पण जायचंय कुठे?" "अरे, गेला आठवडाभर नाही का मी त्या डान्सच्या प्रॅक्टिसला जात होते..." "(हायसं वाटून) अच्छा, तो कार्यक्रम आहे होय." "शी! कार्यक्रम काय म्हणतोस त्यालाऽऽ!" "तेच गं ते, अर्थ एकच... जा तू बिनधास्त! मी सांभाळीन मुलांना." "मुलांना सांभाळायचं आहेच तुला, पुढचे ३-४ तास." "कधी जायचंय?" "आजच रात्रीऽऽऽ! आज ब्यूटिशियनला बोलावलंय, म्हणजे आजच असणार ना? की उद्या असणारे? इतक्या वर्षांत एवढंही कसं कळले...