सहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले.   -----------------------------   कुणी लिहितं कविता,  कुणी खरडतं चारोळ्या,  पसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच  अंतरात्म्याच्या आरोळ्या...   मारावी आरोळी,  नाहीतर पिटावा हाकारा,  पण समर्थपणे तोंड द्यावं,  परिस्थितीच्या नकारा !   परिस्थिती, परिस्थिती,  अरे कोण ही परिस्थिती?  तिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली  यथेच्छ निंदा-नालस्ती ती...   जनाची निंदा, मनाची नालस्ती,  करत होते का  पुराणातले ऋषी अगस्ती?   अरे, पुराणातली वांगी  राहू देत पुराणात,  आधी कामाकडे लक्ष द्या,  मीठ विसरलंय वरणात !   मीठ काय अन् साखर काय,  निव्वळ दोन चवी,  आयुष्यगाथा कशी  पंचरसांनी परिपूर्ण हवी !   आयुष्याला म्हणावे गाथा  नसते अशी प्रत्येकाकडे कथा,  मग कुणी खरडतं चारोळ्या,  तर कुणी लिहितं कविता !!   
Posts
Showing posts from January, 2012