घरोघरी मातीच्या चुली - २
घरोघरी मातीच्या चुली - १   ----------    "अहो, काय हे...!"  ".........."  "तुम्हाला करण्यासारखं दुसरं काही नव्हतं काऽऽ?"  "(काहीच न कळून) नाही ना! हातातलं लेटेस्ट प्रोजेक्ट संपलंय. आणि आता मी काही पूर्वीसारखा बिझी राहिलेलो नाही या प्रोजेक्टवरून लगेच पुढच्या प्रोजेक्टवर उडी मारायला..."  "(हात झटकत) तुमच्या प्रोजेक्टची कौतुकं मला नका सांगू! पूर्वपुण्याईवर अजूनही लोकं तुम्हाला बोलावतायत. नाहीतर काही खरं नव्हतं."  "ते काही का असेना! पण आपला एकुलता एक मुलगा अजूनही स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडतोय. तोपर्यंत एक बाप म्हणून आर्थिक भार उचलणं माझं कर्तव्य नाहीये का?"  "कोण म्हणेल तो अजून स्थिरस्थावर झालेला नाहीये?"  "का? मीच म्हणतोय! तुझ्यामाझ्यात काय लपवालपवी करायची? अभिषेक अजूनही हातपायच मारतोय हे सत्य नाहीये का?"  "हातपायच मारत असता, तर हे... हे शक्य झालं असतं का?"  "काऽऽय शक्य झालं असतं का?"  "(हातातला पेपर नाचवत) हेच... आज सकाळी जे मी वाचलंय ते..."  "(समजुतीच्या सुरात) या वयात असा...