ऐन वसंतात भल्या सकाळी...
आचार-विचार, पद्धती, संभाषण, कालगणना या सगळ्यांतच आपण अति आंग्लाळलेलो असल्यामुळे ‘ऐन वसंतात’ म्हटल्यावर - म्हणजे नक्की कधी बरं? - वसंत म्हणजे चैत्र - वैशाखवणव्याच्या आधीचा उन्हाळा - म्हणजे परिक्षांचे दिवस - म्हणजे मार्च-एप्रिल... अशी आपली विचारांची गाडी जाते। त्याशिवाय त्या ‘ऐन वसंतात’चा कालावधी नक्की करताच येत नाही! मग मार्च-एप्रिलमध्ये, भर उकाड्यात, भल्या सकाळी कोण कोण काय काय करत असतात? वेगळं काही नाही. नोकरदार आणि कष्टकरी मंडळी कामाला निघायच्या घाईत असतात. परिक्षा सुरू असल्या तर विद्यार्थीवर्ग लवकर उठून वह्या-पुस्तकांत डोकं खुपसून बसलेला असतो किंवा सुट्ट्या सुरू झाल्या असल्या तर डाराडूर झोपलेला असतो. निवृत्त ज्येष्ठ नागरिक सूर्य वर यायच्या आत फिरून-बिरून आलेले असतात... मी आणि माझा चौदा वर्षांचा मुलगा मात्र ऐन वसंतात एका रविवारी भल्या सकाळी लोकलची गर्दी सहन करत कुलाब्याला निघालो होतो... मुंबईतल्या लोकलच्या गर्दीला रविवार, साप्ताहिक सुट्टी वगैरेशी तसंही काही देणंघेणं नसतंच! खचाखच भरलेली लोकल... पहाटे साडेपाचला घरातून निघून, लांबलचक रांगेत उभं राहून तिकीटं काढून, सहाची लोकल पकडल्याच...