Posts

Showing posts from 2017

पुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)

Image
जुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय!


शाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई! आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने चर्चा अध…

`इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं!

साधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात! मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एकखूप जुनं इंग्रजी पुस्तक! पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता. ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला क…

‘ब्रेक्झिट’, ‘इटलीव्ह’च्या पाठोपाठ...

जर्मनीघ !! फ्रान्सटक !! हंगरीजा !! हे काय आहे? कसल्या घोषणा? नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द. काय आहे, की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं! वरचे तीन शब्द म्हणजे त्याच जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या ‘मेकिंग’बद्दल...

२०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ‘ब्रेक्झिट’. गंमत बघा, ‘ब्रेक्झिट’च्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ‘ब्रेमेन’ शब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की.

या ब्रेक्झिटबद्दल ऐकलं, थोडंफार वाचलं; आणि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाजूचा आणि दुसरा ब्रेमेनच्या बाजूचा नि…

टुमॉरो वुई डिसअपिअर

दिल्लीत ‘कठपुतली कॉलनी’ नावाची एक वसाहत आहे... ५०-६० वर्षांपूर्वीची... तिथे जवळपास अडीच ते तीन हजार लोक राहतात... ही सारी कुटुंबं म्हणजे पारंपरिक कठपुतळ्यांचा खेळ करणारी; जादूचे-हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारी; नाहीतर डोंबार्‍यासारखे खेळ करणारी, कसरती करून दाखवणारी... अशा प्रकारची ही आशियातली बहुधा सर्वात मोठी वसाहत आहे... यातलं मला काहीही माहिती नव्हतं, ‘टुमॉरो वुई डिसअपिअर’ हा माहितीपट बघेपर्यंत!
या वसाहतीत राहतो एक कठपुतली कलाकार - पुरन भट. त्याच्या पाठोपाठ कॅमेरा त्या वसाहतीतून फिरायला लागतो. अरुंद गल्लीबोळ, घरांची खुराडी, उघडी गटारं, अस्वच्छता... पुरनला हिंदी सिनेगीतांची आवड असावी. ती गाणी ऐकता ऐकता तो आपल्या कठपुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी करताना दिसतो; नवीन काही कठपुतळ्या तयार करताना दिसतो. आपल्याला तो त्याच्या कठपुतळ्यांचं कलेक्शनच दाखवतो. एका कोंदट, अंधार्‍या खोलीत त्याने त्या सार्‍या बाहुल्या ठेवल्या आहेत. त्यांच्या गराड्यातच एका खुर्चीवर तो बसतो. पण त्याला तिथे खूप बरं वाटतं आहे. पुरन परदेशांमधे अनेक ठिकाणी आपली कला सादर करून आलेला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असत…

सुमंगलेऽऽ, माफी असावी...!

साधारण ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. डिसेंबर महिना संपत आला होता. मी नेहमीचं किराणासामान वगैरे काहीतरी आणायला दुकानात गेले होते. दुकानदाराने सुटे पैसे परत करताना सोबत एक लंबुळकं कॅलेंडर ‘फ्री’ दिलं. ‘आणखी एक कॅलेंडर कशाला हवंय’ असं मनाशी म्हणत मी ते तिथेच ठेवून येणार होते. त्यापूर्वी मी ते तिथल्यातिथे सहज उघडून पाहिलं. जेमतेम वीतभर रुंदीचं आणि फूटभर उंचीचं ते कॅलेंडर; पुढल्या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या तारखा एकाखाली एक लिहिलेल्या, प्रत्येक तारखेसमोर दोन-एक इंचांची रिकामी जागा; पानाच्या तळाशी त्या दुकानाची जाहिरात; पुढे फेब्रुवारीचं पान, अशी बारा पानं. आपसूक माझी नजर जानेवारीच्या पानाच्या मागच्या बाजूकडे गेली. (इतक्या वर्षांची सवय!) तर प्रत्येक महिन्याची मागची बाजू पूर्णपणे कोरी होती. इतकं आटोपशीर कॅलेंडर मी प्रथमच पाहत होते. पटकन मनात विचार आला, की घरातल्या ‘नेहमीच्या यशस्वी कॅलेंडर’च्या प्रत्येक तारखेच्या आसपास इतर माहितीची इतकी भाऊगर्दी असते, की मला महत्त्वाच्या वाटणार्‍या दूध-पेपर-इस्त्रीच्या नोंदी, मोलकरणीने कधी दांड्या मारल्या त्याच्या नोंदी, गॅस सिलेंडरबद्दलच्या नोंदी, आणखी…